Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Rate Today : 10 दिवसात झटकन उतरले सोने! 3,500 रुपयांनी स्वस्त झाले भाव, आजचा ताजा दर काय? वाचा

Gold Rate Today : इराण - इस्त्रायल युद्धामुळे चढलेले सोने दहा दिवसांत झटकन खाली उतरले आहे. शे-पाचशेंनी नव्हे तर तब्बल साडे तीन हजार रुपयांनी सोन्याचा भाव घसरला आहे.

सोने ही सर्वकालीन उत्तम गुंतवणूक आहे. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली वेळ आहे. कारण सोने गेल्या १० दिवसांच्या तुलेनत स्वस्त झाले आहे. पूर्वी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा दर १,०१,००० रुपयांवर पोहोचला होता, तर आता तो सुमारे ९७,५०० रुपयांवर आला आहे. म्हणजेच एकूण ३,५०० रुपयांची मोठी घसरण दिसून आली आहे.

Gold Rate Today

आज २४ कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत?

२८ जून २०२५ रोजी आजच्या सोन्याच्या किमतीत ५५० रुपयांची घसरण झाली आहे. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅम ९७,५०० इतके झाले आहेत.

Take a Poll

आज २२ कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत?

२२ कॅरेट सोन्याचे आजचे दर प्रती दहा ग्रॅम ८९,३०० रुपये एवढे झाले आहे. लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही घसरण एक दिलासादायक बातमी आहे.

दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोने: ₹ ८९,४५० / १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोने ₹ ९७,५७० / १० ग्रॅमला विकले जात आहे. तर मुंबईत २२ कॅरेट सोने ₹ ८९,३०० / १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोने ₹ ९७,४२० / १० ग्रॅमला विकले जात आहे.

का झाले सोन्याचे भाव कमी?

  • तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीत ही घसरण डॉलर निर्देशांकातील मजबूती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी कमी झाल्यामुळे झाली आहे.
  • इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धस्थिती आता पुर्वीसारखी नाही. युद्ध थांबले आहे, त्यामुळे सुरक्षित समजली जाणारी सोन्यातील गुंतवणूकही कमी झाली आहे.
  • गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी म्हणून या घसरणीकडे पाहण्याचा सल्ला दिला जात आहे.

आज भारतात चांदीची किंमत किती आहे?

सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही घसरण दिसून आली आहे. चांदीची किंमतही १०० रुपयांनी घसरली आहे आणि १ किलो चांदीची किंमत १,०७,८०० रुपयांवर पोहोचली आहे. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत चांदी प्रति किलो १,०७,८०० रुपयांवर विकली जात आहे.

आज २८ जून रोजी दिल्ली, मुंबईतील सोन्याचे दर

दिल्लीत सोन्याचा दर: आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,५७० आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ८९,४५० रुपये आहे.

मुंबईत सोन्याचा दर : मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९७,४२० रुपये आहे. त्याच वेळी २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८९,३०० रुपये आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+