Todays gold rate: सोन्याचे भाव घसरले, चांदी महाग, सोन्या-चांदीच्या ताज्या किमती जाणून घ्या
Todays gold rate : श्रावण सरत आला असून सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. तर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 72,650 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, 1 किलोचा भाव किंचित वाढीसह 87,000 रुपये आहे.
देशात सोने खरेदीदारांसाठी सध्या चांदी असून सोन्याचे दर थोडे घसरले असून ही दिलासादायक बाब आहे. पण चांदीच्या दरात मात्र घसरण अपेक्षित असतानाही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सध्या श्रावण महिना सुरु असून या काळात उपवासाचे दिवस आहेत. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी फारशी उलाढालही होत नाही. तसंच पावसाळ्यात सोन्याला महाराष्ट्रासह देशात फारशी मागणी नसते त्यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण सुरु आहे हे याला आणखी एक महत्वाचे कारण आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवली गेली, त्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. तसेच सोन्याच्या किमतीतील हा चढउतार जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची ताकद आणि व्याजदरातील बदल यामुळे असू शकतो.
सोने खरेदी ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम आजच्या नवीनतम किंमतींवर एक नजर टाका व जाणून घ्या दर.
आज 22 कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर
1 ग्रॅम: 6,660 रुपये
8 ग्रॅम: रुपये 53,280
10 ग्रॅम: रुपये 66,600
100 ग्रॅम: रुपये 6,66,000
आज 24 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम दर
1 ग्रॅम: 7,265 रुपये
8 ग्रॅम: रु. 58,120
10 ग्रॅम: 72,650 रुपये
100 ग्रॅम: 7,26,500 रुपये
18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम आजचा दर
1 ग्रॅम : 5,449
8 ग्रॅम : 43,592
10 ग्रॅम: 54,490
100 ग्रॅम: 5,44,900 रुपये
प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
(शहर) (22 कॅरेट) (24 कॅरेट) (18 कॅरेट)
पुणे (₹6,660) (₹7,265) (₹5,449)
मुंबई (₹6,660) (₹7,265) (₹5,449)
दिल्ली (₹6,675) (₹7,280) (₹5,462)
चेन्नई (₹6,660) (₹7,265) (₹5,449)
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications