Gold Rate Today सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा पार; तुमच्या शहरातील भाव काय बघा
Gold rate today 20 january 2026 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याने महागाईचा उच्चांक गाठला आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे २० जानेवारी २०२६ रोजी सोन्याच्या किमती 'ऑल टाईम हाय'वर पोहोचल्या आहेत. देशातील मुख्य शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याने १.४६ लाखांचा टप्पा ओलांडला असून, चांदीनेही ३ लाख प्रति किलोचा ऐतिहासिक स्तर गाठला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लावली आहे.

देशातील इतर मोठ्या शहरांतील दर
दिल्ली: २४ कॅरेट - ₹१,४६,४०० | २२ कॅरेट - ₹१,३४,२१०
चेन्नई: २४ कॅरेट - ₹१,४६,७४० | २२ कॅरेट - ₹१,३४,५१० (सर्वात महाग)
कोलकाता: २४ कॅरेट - ₹१,४६,२५० | २२ कॅरेट - ₹१,३४,०६०
अहमदाबाद: २४ कॅरेट - ₹१,४६,३०० | २२ कॅरेट - ₹१,३४,११०
लखनऊ: २४ कॅरेट - ₹१,४६,४०० | २२ कॅरेट - ₹१,३४,२१०
चांदीचा दर (Silver Price Today)
चांदीमध्येही मोठी तेजी पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचा दर ₹३,०५,१०० प्रति किलो आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा भाव विक्रमी ₹३,१८,१०० प्रति किलो वर पोहोचला आहे. गेल्या नऊ दिवसांत चांदी तब्बल ४५,१०० रुपयांनी महागली आहे.
किमती का वाढत आहेत?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ धोरणे आणि ग्रीनलँड वादावरून युरोपीय देशांना दिलेली धमकी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता आहे. अशा काळात गुंतवणूकदार सोन्याला सर्वात सुरक्षित पर्याय मानत असल्याने मागणी वाढली आहे आणि पर्यायाने किमती गगनाला भिडल्या आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे आजचे भाव
मुंबई (Mumbai)
- २४ कॅरेट: ₹१,४६,२५०
- २२ कॅरेट: ₹१,३४,०६०
- १८ कॅरेट: ₹१,०९,६९०
पुणे (Pune)
- २४ कॅरेट: ₹१,४६,२५०
- २२ कॅरेट: ₹१,३४,०६०
- १८ कॅरेट: ₹१,०९,६९०
नागपूर (Nagpur)
- २४ कॅरेट: ₹१,४७,२८०
- २२ कॅरेट: ₹१,३५,०००
- १८ कॅरेट: ₹१,१०,४६०
नाशिक (Nashik)
- २४ कॅरेट: ₹१,४६,२८०
- २२ कॅरेट: ₹१,३४,०९०
- १८ कॅरेट: ₹१,०९,७२०












Click it and Unblock the Notifications