सोने चांदी दरात घसरण ; जाणून घ्या काय आहेत भाव
Gold-Silver Price Today: सोने चांदीच्या भावात सातत्याने चढ उतार पाहायला मिळतोय. विदेशी बाजारांत किमती घसरल्या असल्या तरी स्थानिक बाजारांत सोन्याच्या भावात वधार दिसून येतोय. सोमवारी सोने दराने उसळी घेतल्यानंतर मंगळवारी सोन्याच्या भावात किरकोळ घसरण पहावयास मिळाली. चांदीचे दरसुद्धा थोडे घसरलेले पाहायला मिळाले.

आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 6 हजार 749 रुपये प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव (ज्याला 999 सोने असेही म्हटले जाते ) प्रति ग्राम 7 हजार 363 रुपये नोंदला गेला. तसेच भारतात 10 ग्राम चांदीची किमत 951 रुपये नोंदान्ली गेली. 100 ग्राम चांदी 9 हजार 510 रु आणि एक किलो चांदीची किंमत 95 हजार 100 रुपये इतकी नोंदली गेली.
भारतात आहे प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत
1 ग्रॅम : 6 हजार 749 रुपये
8 ग्रॅम : 53 हजार 992 रुपये
10 ग्रॅम : 67,490 रुपये
100 ग्रॅम : 6 लाख 74 हजार 900 रुपये
भारतात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत "
1 ग्रॅम : 7 हजार 363 रुपये
8 ग्रॅम : 58 हजार 904 रुपये
10 ग्रॅम : 73,630 रुपये
100 ग्रॅम : 7 लाख 36 हजार 300 रुपये
भारतात आज 18 कॅरेट सोन्याची किंमत "
1 ग्रॅम : 5 हजार 522 रुपये
8 ग्रॅम : 44 हजार 176 रुपये
10 ग्रॅम : 55 हजार् 220 रुपये
100 ग्रॅम : 5 लाख 52 हजार 200 रुपये
मुंबईत 22 कॅरेट सोने प्रति 1 ग्रॅम 6 हजार 749 रु, 24 कॅरेट सोने प्रति एक ग्रॅम 7 हजार 363 रु आणि 18 कॅरेट सोने 5 हजार 522 रु प्रति ग्रॅम या प्रमाणे होते तर पुण्यात हेच भाव अनुक्रमे 6 हजार 749, 7 हजार 363 रु आणि 5 हजार 522 इतके नोंदले गेले.
मिस्ड कॉल देऊन कशी जाणावी सोन्याची किंमत ?
तुम्ही स्वतः देखील सोन्याच्या ताज्या किमती सहज जाणून घेऊ शकता. त्यासठी तुम्हाला मिस्ड कॉल करण्याची आवश्यकता आहे. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही 22 कॅरेट सोने आणि 18 कॅरेट सोन्याच्या किमती जाणून घेऊ शकता. कॉल करताच आपल्याला एक एसएमएस येईल ज्यात सोन्याच्या दरांची माहिती देण्यात आलेली असेल.












Click it and Unblock the Notifications