Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोने कडाडले, चांदी कोसळली! 2 दिवसांत चांदी 20 हजारांनी स्वस्त; सोन्याने गाठला 'एवढ्या' लाखांचा दर

Gold Rate Surges Silver Crashes : Latest Prices in India Marathiजागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीचा थेट परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर दिसून आला आहे. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने पुन्हा एकदा महागले असून, दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत चांदी तब्बल २०,००० रुपयांनी कोसळली आहे.

सोने सदासर्वकाळ गुंतवणुकीचे सुरक्षित साधन मानले जाते , पण सध्याची महागाई बघता आता सोन्यात गुंतवणूक करावी की चांदीच्या स्वस्ताईचा फायदा घ्यावा? हे जाणून घेऊया.

Gold Rate Surges Silver Crashes by Rs 20 000 in 2 Days Latest Prices in India Marathi

सोन्याची झळाळी परतली!

आज रविवार बाजार बंद असून शनीवारी व्हॅलेंटाईन डे आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,९७० रुपयांची वाढ झाली. मुंबई, पुणे आणि दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५७,७५० रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नईमध्ये तर सोन्याने १.५९ लाखांच्या दिशेने कूच केली आहे. अमेरिकेतील महागाईचा दर २.४% पर्यंत खाली आल्याने गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा वाढला आहे.

चांदीचा मोठा 'क्रॅश'

सोन्यापेक्षा वेगळी स्थिती चांदीच्या बाबतीत पाहायला मिळत आहे. चांदीने २.८० लाखांचा टप्पा ओलांडला होता, पण आता त्यात मोठी विक्री (Selling Pressure) दिसून येत आहे. शनिवारी चांदी प्रति किलो ५,००० रुपयांनी स्वस्त होऊन २,७५,००० रुपयांवर आली आहे. दोन दिवसांतील ही घसरण पाहता ग्राहकांसाठी चांदी खरेदीची ही एक मोठी संधी मानली जात आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

  • मुंबई: २४ कॅरेट - ₹१,५७,७७५ | २२ कॅरेट - ₹१,४४,६००
  • पुणे: २४ कॅरेट - ₹१,५७,७७५ | २२ कॅरेट - ₹१,४४,६००
  • चेन्नई: २४ कॅरेट - ₹१,५८,८४० | २२ कॅरेट - ₹१,४५,६००

हेही वाचा : Gold Rate : दुबईत कवडीमोल किमतीत मिळतंय सोनं; भारतात काय आहे Gold-Silver Rate?, जाणून घ्या

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+