Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोनं लाखाच्या घरात जाईल का? की ६०-६५ च्या घरात येईल? कोणता अंदाज खरा, कोणता खोटा? वाचा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्यात धोरणामुळे गेल्या १५ दिवसांत सोने चार हजारांनी उतरले होते. आता येत्या काही दिवसांत सोने ६०-६५ हजार रुपये तोळ्यांपर्यंत खाली येईल, असा अंदाज बांधला गेला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत अचानक सोने थेट एक लाखांपर्यंत गेले. त्यामुळे सामान्य गोंधळले. उतरणार, उतरणार म्हणता म्हणता सोन्याने पुन्हा उसळी खाल्ली. आता यातला कोणता अंदाज खरा कोणता खोटा, असा प्रश्न पडला आहे.

why did gold prices increase

सोने सध्या कोठे आहे?

शनिवारी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत सध्या ९५,६७० रुपये झाली. आज शनिवारी ते ९५,४०० रुपयांवर आले. गेल्या दोन दिवसांत सोन्याने मोठी उडी मारली. या प्रकारामुळे सोने उतरेल असे दावे फोल ठरले. सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे आता त्यात घसरण होऊ शकते, असा अंदाज एक्सपर्ट बांधत होते. काहीजण टॅरिफबाबतची परिस्थिती स्पष्ट झाल्याने त्यात उतार येईल, असेही सांगत होते. मात्र झाले उलटेच.

सोन्याचे भाव का वाढले?

सोने उतरण्याचे अंदाज फोल का ठरले? हा प्रश्न आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर मोठे शुल्क लादले. दुसरीकडे चीनदेखील अमेरिकेला सतत प्रत्युत्तर देत राहिला. यामुळे दोघांमधील तणाव धोकादायक पातळीवर पोहोचला. चीन आणि अमेरिका या जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. त्यांच्यातील संघर्षाचा जगावर परिणाम होणे निश्चित आहे. या दोन मोठ्या अर्थव्यवस्थेतील तणावाच्या भीतींमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढली आणि ते वाढले.

आता सोने उतरेल का?

सध्याची परिस्थिती पाहता सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात, असे म्हणता येईल. भारतात १४ एप्रिलपासून लग्नाचा हंगाम सुरू होत आहे. या काळात सोन्याच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सोन्याच्या किमतीतही वाढ होऊ शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. चीन आणि अमेरिकेतील तणाव अजून वाढला तर सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी केले, तर सोन्याची किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

सोने कमी होईल का?

अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे सोने उतरेल ही शक्यता खरी ठरली असती. मात्र त्याचा परिणाम उलटा झाला. चीन व अमेरिकेत तणाव वाढला. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सोन्याच्या गुंतवणुकीवर भर दिला. त्याचा परिणाम उलटा झाला. आता सोन्याचे दर कमी होतील, असे वाटत नाही. उलट लग्नाच्या हंगामातील मागणी लक्षात घेता ते एक लाखांच्या पुढे जातील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+