Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोनं 27 हजारांनी स्वस्त होणार, जगातील या मोठ्या कंपनीने केला दावा

Gold Rate News : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 1 लाखाच्या घरात आहे. मात्र मात्र दोन दिवसात सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. तरी सोने अजून महागच आहे. सध्या लग्नाचा सीझन आहे. त्यामुळे लोकांची सोने खरेदीसाठी गर्दी होत आहे. या वर्षी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 99 हजार रुपयांचा विक्रमी उच्चांक मोडून 70,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच सोने सुमारे 27 हजार रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असा दावा जगातील सर्वात मोठी कंपनी गोल्डमन सॅक्सने केला आहे.

दरम्यान यावर्षी सोन्याच्या किंमतीत लवकरच प्रति 10 ग्रॅम 27,000 रुपयांची घसरण होऊ शकते, असा दावा जगातील सर्वात मोठी सोने खाण कंपनी सॉलिडकोर रिसोर्सेस पीएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विटाली नेसिस यांनी केला आहे.

Gold Rate

गेल्या वर्षी डिसेंबर 2024 पासून सोन्याच्या किमतीत सुमारे 22,650 रुपये प्रति 10 ग्रॅम म्हणजेच 29% वाढ झाली आहे. सध्या सोन्याचा भाव 99,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3,467.87 डॉलर प्रति औंसवर आहे. गोल्डमन सॅक्सच्या मते, ही घसरण अमेरिकेतील व्याजदरातील बदल आणि जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे कमी होऊ शकते.

या वर्षी सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण ?

अशा परिस्थितीत, नेसिसच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमती सुमारे 25% ने कमी होऊ शकतात. म्हणजेच भारतीय बाजारात सोन्याची किंमत कमी होऊन ती प्रति 10 ग्रॅम 70 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचू शकते. सोन्याच्या किमतीत झालेली ही विक्रमी वाढ जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजनीतिक तणावमुळे झाली आहे, असे नेसिसचे मत आहे. जागतिक परिस्थिती सुधारताच सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होईल, असा दावा करण्यात आला आहे.

सोन्याच्या किमतीतील वाढ आणि सध्याची परिस्थिती

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत सोन्याचा भाव 22,650 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 99,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3,500.10 डॉलर प्रति औंसच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता, परंतु आता तो किंचित कमी होऊन 3,467.87 डॉलर प्रति औंसवर स्थिर झाला आहे. या वाढीमुळे सोने हा गुंतवणूकदारांसाठी आकर्षक पर्याय बनला आहे, विशेषतः जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजनीतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हे भाव वाढत आहेत.

सोन्याने मागील काही वर्षांत शेअर आणि बाँड्सच्या तुलनेत चांगला परतावा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याने रिटर्नच्या बाबतीत शेअर आणि बाँड्सपेक्षा उत्तम कामगिरी केली आहे. विशेषतः, जागतिक बाजारात ट्रेड वॉर, महागाईचा दबाव आणि केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या खरेदीमुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आहे. भारतातही अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या सीझनमुळे सोन्याला मागणी वाढली आहे, परंतु आता गोल्डमन सॅक्सच्या या दाव्याने बाजारात नवीन चर्चा सुरू झाली आहे.

महिलांच्या चिंता वाढल्या

सोन्याच्या किमतीत झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे केवळ बाजारपेठेलाच धक्का बसला नाही तर सामान्य लोकांच्या खिशावरही खोलवर परिणाम झाला आहे. सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. लग्नासाठी मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी करावी. मात्र सोन्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य कुटूंबासाठी सोने खरेदी करणे कठीण होत जात आहे. तसेच अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणे हे प्रत्येक भारतीय कुटुंबाचे प्राधान्य असते, अशा वेळी या मौल्यवान धातूच्या किमतीत अनपेक्षित वाढ झाल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांना धक्का बसला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+