Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इस्रायल-इराण तणावानंतर सोन्याचे रेकाॅर्डतोड भाव! का वाढत आहेत सोन्याचे दर? या 3 कारणातून समजून घ्या

Gold Price today silver rate 14 june 2025 : इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावादरम्यान, कमकुवत रुपया आणि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दराने एक लाखांचा टप्पा पार केल्यानंतर सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. भारतातील सर्व प्रमुख शहरे, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे हा दर आहे.

Gold Price today

आजचे सोन्याचे भाव काय?

१४ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) गोल्ड इंडेक्स ₹१ ला ३१४ रुपये प्रति १० ग्रॅम होता. इंडियन बुलियन असोसिएशन (IBA) नुसार, आज १४ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या आकडेवारीनुसार, प्रति दहा ग्रॅमची २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹१ लाख ४६० होती.

Take a Poll

२२ कॅरेट सोन्याचे दर किती

२२ कॅरेट सोन्याचे दर आज १० ग्रॅमसाठी ९२ हजार ८८ रुपये होता. आपण देशांतर्गत बाजारात सध्या देशातील सर्व शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांबद्दल बोललो तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ९२ ते ९३ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
आज १४ जून रोजी देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

दिल्ली सोन्याचा दर : आज दिल्लीत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,५५० आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ९३,१०० रुपये आहे.

मुंबई सोन्याचा दर : मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,४०० रुपये आहे. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९२,९५० रुपये आहे.

चेन्नई सोन्याचे दर : चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९२,९५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,०१,४०० रुपये आहे.

अहमदाबाद सोन्याचा दर : अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९३,००० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,०१,४५० रुपये आहे.

लखनऊ सोन्याचा दर: लखनऊमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९३,१०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,०१,५५० रुपये आहे.

जयपूर सोन्याचा दर : जयपूरमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९३,१०० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,०१,५५० रुपये आहे.

हैदराबाद सोन्याचा भाव : हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९२,९५० रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,०१,४०० रुपये आहे.

सोन्याच्या किमती का वाढत आहेत? तीन महत्वाची कारणं

१. मध्य पूर्वेतील तणाव : इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पैशाच्या शोधात सोने खरेदी करत आहेत.

२. रुपयाची कमजोरी: डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे सोने महागले

३. शेअर बाजारातील अस्थिरता : शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार त्यांच्या सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत, ज्यामध्ये सोने प्रमुख आहे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+