Gold Price Today Nov 5 :सोन्याचे भाव घसरले! 'गुरु पर्व'च्या दिवशी सोन्याचे झटक्यात एवढे खाली आले भाव
Gold Price Today Nov 5 : आज गुरु नानक जयंतीचा (गुरु पर्व) शुभ दिवस आहे. सुट्टीमुळे आज कमोडिटी मार्केट बंद असले तरी, देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात लक्षणीय घसरण नोंदवली गेली आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर खाली आल्याने ग्राहक आनंदी आहेत.
आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव मागील दिवसाच्या तुलनेत तब्बल ₹९८० नी घसरला आहे. चांदीच्या दरातही मोठी कमजोरी दिसून आली आहे.

आजचे सोन्याचे ताजे दर (५ नोव्हेंबर २०२५)
आज ५ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या प्रति १० ग्रॅमचे दर जाणून घेऊया. २४ कॅरेट शुद्ध सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख २१ हजार ४८० रुपये इतके झाले आहेत. कालच्या तुलनेत ही घसरण प्रति १० ग्रॅम ₹९८० रुपये झाली आहे.
२२ कॅरेट दागिन्यांबाबत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख ११ हजार ३५० रुपये इतके झाले आहे. कालच्या तुलनेत प्रति १० ग्रॅम ९०० रुपये इतकी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
१८ कॅरेट दागिन्यांचा विचार करता सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ९१ हजार ११० रुपये इतके झाले आहेत. कालच्या तुलनेत घसरणीचा विचार केला तर प्रति १० ग्रॅम सोने ७३० रुपयानी आज कमी झाले आहे.
चांदीचा ताजे भाव
- दर (प्रति किलो): ₹१,५०,५००
- कालच्या तुलनेत घसरण: ₹५०० नी कमी
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील दर (प्रति ग्रॅम)
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि जळगाव या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे दर जवळजवळ समान आहेत.
मुंबई:
- २४ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹१२,१४८
- २२ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹११,१३५
- १८ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹९,१११
पुणे:
- २४ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹१२,१४८
- २२ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹११,१३५
- १८ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹९,१११
नागपूर:
- २४ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹१२,१४८
- २२ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹११,१३५
- १८ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹९,१११
नाशिक:
- २४ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹१२,१४८
- २२ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹११,१३५
- १८ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹९,१११
जळगाव:
- २४ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹१२,१४८
- २२ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹११,१३५
- १८ कॅरेट (प्रति ग्रॅम): ₹९,१११
Disclaimer : वाचकांना विनंती आहे की, सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा दागिने खरेदी करण्यापूर्वी आपल्या स्थानिक ज्वेलर्सकडे किंवा बाजारातील तज्ञांकडून दरांची खात्री करून घ्यावी. हा लेख केवळ माहितीसाठी आहे आणि कोणत्याही व्यावसायिक किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय नाही.
हेही वाचा : Gold Purity : शुद्ध सोने आणि बनावट सोने कसे ओळखायचे? 'या' सरकारी ॲपबद्दल जाणून घ्या, टळेल फसवणूक












Click it and Unblock the Notifications