Gold price Today : सोने-चांदीने दिवाळीआधीच मोडले सर्व रेकॉर्ड; आज 'एवढे' झाले भाव, दर आणखी वाढणार!
Gold Price Today in marathi : सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड मोडले असून दिवसागणिक सोने किमतीसंदर्भात नवीन विक्रम करत आहे. दिवाळीपुर्वीच सोन्याने चांगलाच 'भाव' खाल्ला आहे. सणासुदीच्या दिवसांपूर्वीच सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना आज ७ ऑक्टोबर २०२५ रोजी जोरदार आर्थिक झटका दिला आहे.
गेल्या तीन दिवसांच्या तात्पुरत्या घसरणीनंतर, आज मौल्यवान धातूंनी थेट 'यू टर्न' घेतला असून, २४ कॅरेट सोन्याने अनेक शहरांमध्ये नवा ऐतिहासिक उच्चांक नोंदवला आहे. विशेष म्हणजे, चांदीने तर ₹ १ लाख ५६ हजार प्रति किलोचा आकडा पार करत गुंतवणूकदारांचे डोळे पांढरे केले आहेत.

सद्यस्थितीचा विचार केल्यास सोन्याच्या किमतीत जोरदार उसळी दिसून आली आहे. डॉलर कमकुवत झाल्याने ही उसळी पाहायला मिळाली आहे. जगभरातील डॉलरची कमजोरी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढलेली मागणी, यामुळे आता दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोने-चांदीने रचले ऐतिहासिक दर
आज सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ ही केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, ती गुंतवणूक आणि औद्योगिक मागणीतील मोठ्या बदलांचे संकेत देत आहे. गुंतवणूकदारांसाठी हे बहुमतांशी फायदा आणि तोट्याचे गणित झाले आहे, सोने खरेदी करावे की थांबावे या संम्रभात सामान्य ग्राहक आहे, त्याला कारण म्हणजे सोन्याने गाठलेला ऐतिहासिक दर हा आहे.
आज ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सोने-चांदीचे भाव
आज चांदी प्रति किलोग्रॅम १ लाख ५६ हजार १०० रुपयांच्या नव्या उच्चांकांवर आहे, ही मोठी वाढ औद्योगिक क्षेत्रातील मागणीमुळे आहे, तर २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २१ हजार ३८० रुपयांवर पोहटले आहे. देशात सर्वाधिक चेन्नईमध्ये दर आहेत.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय? (दर प्रति १० ग्रॅम)
- आर्थिक राजधानी मुंबईत २४ कॅरेट सोने १ लाख २० हजार ७८० रुपयांवर पोहचले आहे तर २२ कॅरेट सोने १ लाख १० हजार ७१० रुपयांवर पोहचले आहे.
- दिल्लीत सोन्याने दराचा विक्रम मोडला असून तिथे २४ कॅरेट सोने १ लाख २० हजार ९३० तर २२ कॅरेट सोने १ लाख १० हजार ८६० रुपयांवर पोहचले.
- देशात चेन्नईत सोने सर्वात महाग असून तिथे २४ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅम १ लाख २१ हजार ३८० रुपयांवर पोहचले तर २२ कॅरेट सोने १ लाख ११ हजार २६० रुपयांवर पोहचले आहे.
- हैदराबादेत २४ कॅरेट सोन्याचे प्रति १० ग्रॅमचे दर १ लाख २० हजार ७८० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १ लाख १० हजार ७१० रुपयांवर पोहचले आहेत.
- अहमदाबादेत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १ लाख २० हजार ३८० रुपये तर २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम १ लाख १० हजार ७६० रुपयांवर पोहचले आहे.
दर आणखी वाढणार? अर्थतज्ज्ञांचा अंदाज
सोन्याच्या गुंतवणुकीतील विश्लेषकांच्या मते, सोन्याच्या दरातील ही तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची स्थिती नाजूक असल्याने, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे ओढा वाढला आहे. तर चांदीची औद्योगिक मागणी वेगाने वाढत असल्याने येत्या काळात चांदीचे दर आणखी वाढू शकतात.












Click it and Unblock the Notifications