बुधवारी सोनं पुन्हा महागलं,देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव किती ?
Gold Price Today: दिवसेंदिवस सोन्याच्या भावामध्ये वाढ होत असून भाव गगनाला भिडले आहेत ,त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोन्याची खरेदी करणे कठीण झाले आहे.बुधवारी 17 जुलै रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे बेंगळुरूच्या बाजारात सोन्याचा भाव दहा ग्रॅम म्हणजे एक तोळ्यावर 980 रुपयांनी वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरानेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच, COMEX वर सोन्याने $2460 ओलांडले आहे. त्यामुळेच देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या भावात मोठी वाढ होत आहे. बेंगळुरूमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,875 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,500 रुपये प्रति ग्रॅमने वाढली आहे
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 900 रुपयांनी वाढून 68750 रुपयांवर पोहोचला आहे. 100 ग्रॅमची किंमतही 9000 रुपयांनी वाढून 687500 रुपयांनी विकली जात आहे. 24 कॅरेट सोन्याचा दरही 980 रुपयांनीं वाढून 75000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकले जात आहे.
100 ग्रॅमचा भावही 9800 रुपयांनी वाढून 750000 रुपयांवर पोहोचला आहे. याशिवाय 18 कॅरेट सोन्याचा दरही 730 रुपयांनी वाढला असून 56250 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकला जात आहे. त्याच्या 100 ग्रॅमच्या दरातही 7300 रुपयांची वाढ झाली असून 562500 रुपयांना विकली जात आहे
देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये 10 ग्राम सोन्याचा भाव
मुंबई - 67,860 - 74030
पुणे- 67,179 -73,339
चेन्नई - 68,310 - 74,520
कोलकाता - 67,860 - 74,030
गुरुग्राम - 68,010 - 74,180
लखनौ - 68,010 - 73,780
बेंगळुरू - 67,860 - 74,030
जयपूर - 68,010 - 74,180
पाटणा - 67,910 - 74,080
भुवनेश्वर - 67,860 - 74,030
हैदराबाद - 67,860 - 74,030












Click it and Unblock the Notifications