Gold Price Today: सोन्याला चढला भाव; आज पुन्हा प्रतितोळा 2200 रुपयांनी वाढले दर, ताजे रेट घ्या जाणून
Gold Price Today : सोन्यासारखे सोनेच..असे म्हणतात ते काही खोटे नाही. या सोन्याने लाखाच्या जवळ मजल मारली अन् आता हेच सोने दिमाखात आपला भाव मिरवत आहे. सोन्याचे आजचे ताजे भाव अपडेट झाले आहेत, सोन्याच्या किमतीत आज सोमवारी ५ एप्रिल २०२५ रोजी वाढ झाली आहे.
वायदा बाजारापासून ते सराफा बाजारापर्यंत, दोन्ही बाजारात सोन्याच्या वाढत्या दराची चर्चा असून या बाजारात किमती वाढत आहेत. आज, ५ मे रोजी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात तब्बल २२०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या किमती वाढत आहेत.

आजचा सोने आणि चांदीचा भाव
आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ९,५७३ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ८,७७५ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ७,१८० रुपये आहे. उलट, चांदीच्या किमतीत घट दिसून येत आहे. आज सराफा बाजारात चांदीचा भाव प्रति ग्रॅम १०८ रुपये आणि किलोग्रॅम १,०८,००० रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय?
आज मुंबई सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याची किंमत २०० रुपयांनी वाढून ८७७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. १०० ग्रॅमची किंमतही २००० रुपयांनी वाढून ८७७५०० रुपयांवर पोहोचली आहे.
२४ कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय?
२४ कॅरेट सोन्याचा दर २२० रुपयांनी वाढला आहे, जो ९५७३० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकला जात आहे. तर प्रति १०० ग्रॅम २२०० रुपयांनी वाढून ९५७३०० रुपयांवर पोहोचली आहे.
१८ कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय?
१८ कॅरेट सोन्याच्या किमतीत १६० रुपयांची वाढ झाली आहे, जी ७१८०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकली जात आहे. १०० ग्रॅमच्या किमतीत १६०० रुपयांची वाढ झाली आहे आणि ती ७१८००० रुपयांना विकली जात आहे.
देशातील इतर शहरांमध्ये सोन्याचा दर किती?
मुंबई - २२ कॅरेट सोन्याची किंमत ८७७५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९५७३० रुपये तर १८ कॅरेट सोने ७१८०० रुपये आहे.
बंगळुरू - आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,५७३, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹८,७७५ आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹७,१८० आहे.
चेन्नई - आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,५७३, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹८,७७५ आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹७,२५० आहे.
गुवाहाटी - आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,५७३ आहे, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹८,७७५ आहे आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹७,१८० आहे.
नवी दिल्ली - आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,५८८, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹८,७९० आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹७,१९२ आहे.
इंदौर - आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,५७८ आहे, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹८,७८० आहे आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹७,१८४ आहे.












Click it and Unblock the Notifications