Gold Price : ऑगस्टच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर घसरले! मुंबई, पुणे, नाशिकमधील सोन्याचे नवे दर तपासा
Gold Price today Drops : भारतातील सोन्या-चांदीच्या दरात आज १ ऑगस्ट २०२५ घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने-चांदीच्या दराने ही किमया केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा तोरा लाखाच्या पार होता तो आता खाली आला आहे. जर तुम्ही सोने-चांदीची खरेदी करणार असाल तर आजचे ताजे घटलेले भाव तपासायला हवे मगच सोने खरेदी करणे श्रेयस्कर ठरेल.

आज (१ ऑगस्ट २०२५) किती आहेत सोने-चांदीचे भाव?
२४ कॅरेट सोने (१०० ग्रॅम): ९,९८,२०० (२,१०० रुपयांनी घसरण)
२४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ९९,८२० (२१० रुपयांनी घसरण)
२२ कॅरेट सोने (१०० ग्रॅम): ९,१५,००० (२,००० रुपयांनी घसरण)
२२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ९१,५०० (२०० रुपयांनी घसरण)
१८ कॅरेट सोने (१० ग्रॅम) : ७४,८७० (१६० रुपयांनी घसरण)
चांदी (१ किलो) : १,१३,००० (२,००० रुपयांनी घसरण)
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमध्ये सोन्याचे दर काय?
मुंबई - Mumbai Gold Rate
मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,९८२, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,१५० आणि १८ कॅरेट सोन्याचा दर ७,४८७ आहे.
नागपूर - Nagpur Gold Rate
नागपूरमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,९८२, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,१५० आणि १८ कॅरेट सोन्याचा दर ७,४८७ आहे.
पुणे - Pune Gold Rate
पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,९८२, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,१५० आणि. यावर्षी सोन्याने चांगली तेजी दाखवली आहे, त्यामुळे घसरण होण्याची शक्यता कमी आहे.
नाशिक - Nashik Gold Rate
नाशिकमध्ये आज सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,९८५, २२ कॅरेट सोन्यासाठी प्रति ग्रॅम ₹९,१५३ आणि १८ कॅरेट सोन्यासाठी ₹७,४९० प्रति ग्रॅम आहे.
कशामुळे सोन्याचे भाव घसरले?
भारतावरील २५% कर: अमेरिकेने भारतावर २५% कर लावल्याने भारतीय बाजारात नकारात्मक भावना निर्माण झाल्या.
मजबूत अमेरिकन डॉलर: अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्यासारख्या आंतरराष्ट्रीय वस्तूंमध्ये गुंतवणूक कमी झाली.
फेडरल रिझर्व्हची भूमिका: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवले असले, तरी सप्टेंबरमध्ये व्याजदर कपातीची शक्यता कमी असल्याने बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह मंदावला.
बाजारातील तज्ज्ञ काय म्हणतात?
जागतिक सुवर्ण परिषदेनुसार, दुसऱ्या तिमाहीत दागिन्यांची जागतिक मागणी १४ टक्क्यांनी घटली आहे, जी २०२० नंतरची सर्वात कमी आहे. तर गुडरिटर्न्सनुसार, केडिया ॲडव्हायझरीचे अजय केडिया सांगतात की, तांत्रिकदृष्ट्या, सोन्यावर नवीन विक्रीचा दबाव आहे. ९८,४६५ रुपयांच्या पातळीला सोन्याला आधार आहे. ही पातळी तोडल्यास किंमत ९८,१५५ पर्यंत खाली येऊ शकते. याउलट, किंमत ९९,१९० रुपयांच्या वर गेल्यास ती ९९,६०५ पर्यंत वाढू शकते.
(टीप- गुंतवणूकदारांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि ताजे भाव तपासणे महत्त्वाचे आहे)












Click it and Unblock the Notifications