Gold Price Today: दसऱ्याच्या दिवशी सोने स्वस्त की महाग? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या सोन्याचा दर
Gold Price Today 12 Oct 2024: देशभरात आज दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. सोने आणि चांदी सध्या भारतात नवे-नवीन उच्चांक गाठत आहेत .साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्या दसर्याच्या शुभ मुहुर्तावर सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या दरात कोणतीही घट होणार नाही. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार रुपयांच्या वर आहे. जर तुम्ही दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,900 रुपयांच्या पुढे गेली आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात ही दररोज वाढ होताना दिसत आहे. आजही चांदीच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत चांदी भाव 96,100 रुपये किलोवर आहे. चेन्नईत एक लाख रुपये किलोने चांदीची विक्री होत आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर काय आहे?
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,123 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,770 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications