Gold Price Today: नवरात्रीच्या तिस-या दिवशी ही सोन्या-चांदीच्या दरात वाढ , जाणून घ्या आजचे ताजे भाव
Gold Price Today: मागील काही दिवसापासून सोने-चांदीच्या दरात चांगलीच वाढ होत आहे. गरीब असो किंवा श्रींंमत लोकांचा कल ही सोन्याच्या गुंतवणूकीकडे वाढत आहे. आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळतेय. आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.
देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार 600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. मात्र अनेक शहरांमध्ये हा दर 77,800 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर देखील आता 71,200 रुपयांवर पोहोचत एक नवा उच्चांक गाठला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे.

चांदीच्या दरातही काहीशी वाढ झाली आहे. चांदीचा सध्या 94,900 रुपये प्रतिकिलो भाव आहे.तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,123 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,770 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,120 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,767 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications