Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोन्या-चांदीच्या पुन्हा दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरात 22 कॅरेट-24 कॅरेट सोन्याचा दर

Gold Price Today : नवीन वर्ष 2025 सुरू झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. नवीन वर्षाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच 4 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव 750 रुपयांनी वाढला. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत ही वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

आज देशभरात 24 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 72 हजार रुपयांच्या पुढे आहे. गेल्या वर्षी सोन्याने 2024 मध्ये गुंतवणूक केलेल्यांना 27 टक्के परतावा दिला आहे. 2010 पासून सोन्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.

Gold Price Today

आज चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. आज एक किलो चांदीचा दर 92,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

देशातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर

दिल्ली : दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार 350 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,200 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकत्ता : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जयपूर : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पाटणा : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 72,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैदराबाद : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बंगळुरू: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+