Gold Price Today : दिवाळीत सोनं महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव
Gold Price Today : देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी हा महत्वाचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. दिवाळीला म्हणजेच 31 ऑक्टोबरला सोन्याने 81 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 81 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वर आहे. सध्या देशात चांदीनेही एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती विक्रम मोडत आहेत. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 81हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दर 74 हजार रुपयांच्या पुढे आहे.

चांदी एक लाख रुपये किलो आहे. चांदीच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे दागिने आणि चांदीच्या भांड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,455 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,133 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,455 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,133 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,455 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,133 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,455 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,133 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,458 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,136 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,455 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,133 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,455 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,133 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications