Gold Price Today : भाऊबीजेच्या दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
Gold Price Today : देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी हा महत्वाचा सण साजरा करण्यात येत आहे. दिवाळी भाऊबीजेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. आज रविवार 3 नोव्हेंबरला देशातील सोन्या-चांदीच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे. देशात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 300 ते 500 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती विक्रम मोडत आहेत. मात्र रविवारी एमसीएक्स बंद राहील. 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 80 हजार रुपयांच्या पुढे आहे. ज्वेलरी खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 73 हजार 500 रुपयांच्या पुढे आहे.

गेल्या आठवडाभरात चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली आहे. आज रविवार 3 नोव्हेंबरला चांदी 97 हजार रुपये प्रतिकिलो आहे. चांदीच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे दागिने आणि चांदीच्या भांड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. चला जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,370 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹8,040 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,370 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹8,040 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,370 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹8,040 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,370 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹8,040 प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,373 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,043 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,370 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,040 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,370 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,040 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications