Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : बजेटचा सोन्याच्या किंमतीवर काय परिणाम होईल? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्थेत सोन्याने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोनं केवळ दागिन्यांचा तुकडा किंवा गुंतवणूकीचे साधन नाही तर ते सुरक्षितता आणि स्थिरतेचे प्रतीक देखील मानले जातं. अलिकडच्या काळात सोन्याच्या किमतीतील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदार आणि सामान्य जनता चिंतेत आहे.

जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती, डॉलरची किंमत आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याची मागणी तसेच भारत सरकारच्या अर्थसंकल्पीय धोरणांचा सोन्याच्या किमतींवर खोलवर परिणाम होतो. यावर्षीच्या अर्थसंकल्पाबाबतही अनेक अंदाज बांधले जात आहेत. सरकारकडून आयात शुल्कात बदल, जीएसटी दरांमध्ये सुधारणा किंवा सोन्याशी संबंधित गुंतवणूक पर्यायांवरील नवीन धोरणांचा सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचे मत आहे.

Gold Price Today

जर सरकारने सोन्यावरील आयात शुल्क कमी केले तर सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. त्याच वेळी जर सोन्याशी संबंधित गुंतवणूक पर्यायांना प्रोत्साहन दिले तर सोन्याची मागणी आणि किंमत दोन्ही वाढू शकतात. आज देशभरात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,595 आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8,285 आहे. आज तसेच चांदीचा दर किलोग्रॅम 96,500 आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,595 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,285 आहे.

ठाणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,595 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,285 आहे.

पुणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,595 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,285 आहे.

नागपूर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,595 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,285 आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,598 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,288 आहे.

जळगाव- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,595 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,285 आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,595 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,285 आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+