Gold Price Today : आज सोनं स्वस्त की महाग ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव
Gold Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ आहे. मात्र आज सोन्याच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे. ही घसरण देशांतर्गत बाजारपेठेतील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ट्रेंडमुळे होत आहे. आज देशभरात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. ज्यामुळे दागिने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
लग्न असो किंवा इतर कोणताही खास प्रसंग असो, सोने ही नेहमीच भारतीय कुटुंबांची पहिली पसंती राहिली आहे. अशा परिस्थितीत किंमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तसेच सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो.

येत्या काळात सोन्याच्या किमती स्थिर राहू शकतात,असे तज्ज्ञांचे मत आहे. जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,510 आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 8,193 रुपये आहे. आज देशभरात चांदीचा दर प्रति किलोग्रॅम 96,500 रुपये आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,510 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,193 रुपये आहे.
ठाणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,510 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,193 रुपये आहे.
पुणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,510 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,193 रुपये आहे.
नागपूर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,510 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,193 रुपये आहे.
नाशिक- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,513 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,196 रुपये आहे.
जळगाव- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,510 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,193 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,510 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,193 रुपये आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications