Gold Price Today : सोनं 80 हजाराच्या घरात, चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून देशभरात सोन्याचे भाव दररोज नव-नवीन उच्चांक गाठत आहेत. दिवाळीचा सण सण जसजसा जवळ येत आहेत तसतसे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. दिवाळी झाली की पुन्हा लगीनसराईचा सीझन आहे. त्यामुळे सोन्याचे दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आज शनिवार 26 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 80 हजार पुढे पोहोचला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमती विक्रम मोडत आहेत. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 73 हजार रुपये आहे.

आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदी 97,900 रुपये प्रतिकिलो आहे. तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,360 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,029 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,360 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,029 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,360 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,029 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,360 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,029 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,263 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,032 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,360 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹8,029 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,360 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,029 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications