Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोने स्वस्त झालं, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचे दर

Gold Price Today : मागील काही दिवसांपासून भारतात सोने आणि चांदी दर दररोज नव-नवीन उच्चांक गाठत आहेत. दोन दिवसांपुर्वीच 10 ग्रॅम सोन्याने 80,000 रुपये तर चांदीने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र आज शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात 600 रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

देशभरात दिवाळी आणि धनत्रयोदशी हा महत्वाचा सण जसजसा जवळ येत आहेत तसतसे सोन्या-चांदीचे भाव नवे उच्चांक गाठत आहेत. अशा स्थितीत आज थोडीशी घसरण झाल्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.

Gold Price Today

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती विक्रम मोडत आहेत. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 79 हजार रुपयांच्या पुढे आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दर सुमारे 73 हजार रुपये आहे. आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदी 1,01,900 रुपये प्रति किलो आहे. तर चला जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,295 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,958 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,295 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,958 प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,295 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,958 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,295 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,958 प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,298 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,961 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,295 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,958 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,295 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,958 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+