Gold Price Today : सोन्याचा नवा उच्चांक, दरवाढीचे सर्व विक्रम मोडीत काढले, जाणून घ्या आजचे भाव
Gold Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. सोने-चांदीतील हे बदल गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते. आज 25 जानेवारी 2025 रोजी सोन्याचा भाव स्थिर आहे.
आज देशभरात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 82 हजार रुपये आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. आज चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 97,600 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,555 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,242 रुपये आहे.
ठाणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,555 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,242 रुपये आहे.
पुणे- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,555 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,242 रुपये आहे.
नागपूर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,555 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,242 रुपये आहे.
नाशिक- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,558 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,245 रुपये आहे.
जळगाव- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,555 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,242 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,555 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,242 रुपये आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications