Gold Price Today : ख्रिसमसच्या दिवशी सोनं स्वस्त की महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार पाहायला मिळतात. आज बुधवार 25 डिसेंबर ख्रिसमसच्या दिवशी सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. सोने नेहमीच गुंतवणूक दारांची आणि महिलांची पहिली पसंती राहीली आहे.
सोन्याच्या किमतीत चढउतार सुरु असून लग्नसराईत सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या लग्नाचे सीझन आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीवर सर्वांचे लक्ष असते. सोन्याच्या किमतीचा केवळ दागिन्यांच्या खरेदीवरच परिणाम होत नाही तर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा असतो.

दररोज बदलणाऱ्या किमती तुमच्या बजेट आणि नियोजनावर परिणाम करू शकतात. जर तुम्हीही दागिने खरेदी करण्याचा किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे भाव नक्की पहा.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत. आज भारतात चांदीची किंमत 91,500 प्रति किलो आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,103 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,748 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,100 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,745 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications