Gold Price Today: धनत्रयोदशीपूर्वी सोनं 80 हजारांच्या पुढे, चांदीला विक्रमी भाव ,जाणून घ्या आजचे भाव
Gold Price Today : देशभरात सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मागील दोन आठवड्यापासून सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ होत आहे. सणासुदीला काळात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. बुधवारी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज गुरुवारी सोन्या-चांदीच्या दरात 1 टक्क्यांनी किरकोळ घसरण झाली आहे. पुढील आठवड्यात दिवाळी आणि धनत्रयोदशी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमती विक्रम मोडत आहेत.
देशभरात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार रुपये आहे. तर चांदीने 1,00,018 रुपये प्रति किलोचा नवा विक्रम गाठला आहे. आज चांदीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदी एक लाख रुपये प्रतिकिलो आहे. तर चला जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,947 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,947 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,288 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,950 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications