Gold price today: आज सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचे भाव एका झटक्यात 'एवढ्या' रुपयंनी आले खाली
Gold price today 24 nov : सणासुदीच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आज दिलासा देणारी बातमी आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची कमी झालेली शक्यता आणि भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे आज (सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५) भारतीय बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) सह सराफा बाजारातही मौल्यवान धातूंच्या भावात लक्षणीय घट झाली आहे.

सराफा बाजारात दर किती घसरले?
आज देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याचे दर खालीलप्रमाणे घसरले आहेत. सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५ रोजीचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) किती आहेत हे जाणून घेऊया.
१. २४ कॅरेट सोने
- रविवारचा बंद भाव: ₹ १,२५,८४०
- आजचा भाव: ₹ १,२५,१३०
- घसरण: ₹ ७१०
२. २२ कॅरेट सोने
- रविवारचा बंद भाव: ₹ १,१५,३५०
- आजचा भाव: ₹ १,१४,७००
- घसरण: ₹ ६५०
३. १८ कॅरेट सोने
- रविवारचा बंद भाव: ₹ ९४,३८०
- आजचा भाव: ₹ ९३,८५०
- घसरण: ₹ ५३०
२४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर (प्रति ग्रॅम)
(मुंबई / पुणे / नागपूर / नाशिक / कोलकाता / बेंगलोर / हैदराबाद / केरळ या शहरांतील दर एकसमान आहेत)
१. २४ कॅरेट सोने (प्रति ग्रॅम)
आजचा भाव: ₹ १२,५१३
२. २२ कॅरेट सोने (प्रति ग्रॅम)
आजचा भाव: ₹ ११,४७०
३. १८ कॅरेट सोने (प्रति ग्रॅम)
आजचा भाव: ₹ ९,३८५
चांदीच्या दरातही घसरण
- सोनेच नव्हे तर चांदीच्या दरातही आज घसरण नोंदवली गेली आहे.
- रविवारचा दर (प्रति किलोग्रॅम): ₹ १,६४,०००
- आजचा दर (प्रति किलोग्रॅम): ₹ १,६३,०००
- घसरण: ₹ १,०००
MCX मध्येही मोठी पडझड
एमसीएक्सवर (वायदा बाजार) सोन्याच्या ५ डिसेंबर २०२५ च्या वायदा करारात ₹ १,५०० हून अधिकची घसरण होऊन ते ₹ १,२२,६०५ प्रति १० ग्रॅमच्या नीचांकी पातळीवर पोहोचले. तर चांदीच्या ५ डिसेंबर वायदा करारामध्येही सुमारे ₹ १,५०० ची घसरण होऊन ते ₹ १,५२,४१५ प्रति किलोग्रॅमच्या नीचांकी पातळीवर आले.












Click it and Unblock the Notifications