Gold Price Today : आज सोने-चांदी स्वस्त की महाग ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात पडझड सुरुच आहे. मात्र आज मंगळवार 24 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोने हा नेहमीच भारतीय परंपरा आणि गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.
लग्न असो, सण असो किंवा कोणताही विशेष प्रसंग असो, भारतीय घरांमध्ये सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतीवर सर्वांचे लक्ष असते. सोन्याच्या किमतीचा केवळ दागिन्यांच्या खरेदीवरच परिणाम होत नाही तर गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा असतो.

दररोज बदलणाऱ्या किमती तुमच्या बजेट आणि नियोजनावर परिणाम करू शकतात. जर तुम्हीही दागिने खरेदी करण्याचा किंवा सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे भाव नक्की पहा.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 70 हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत. आज भारतात चांदीची किंमत 91,400 प्रति किलो आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,090 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,735 प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,093 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,738 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
कोल्हापूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,090 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
सोलापूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,090 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,090 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications