Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात वाढ, चांदीचे भावही वाढले, जाणून घ्या आजचे ताजे भाव

Gold Price Today : सणासुदीचा हंगाम सुरू होताच भारतात सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होत आहे. ही वाढ प्रामुख्याने देशांतर्गत मागणी आणि जागतिक आर्थिक बाजारपेठेत होणारी उलाढालीवर ठरते. त्यामुळे सोने-चांदीच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

नेहमीप्रमाणेच या वर्षी ही सणासुदीच्या काळात भारतात सोन्याच्या दरात वाढ होते. कारण या काळात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तसे ही सोने ही नेहमीच गुंतवणूकदरांची पहिली पसंदी राहिली आहे.

Gold price today

दरम्यान जागतिक आर्थिक बाजारातील परिस्थिती म्हणजेच अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक बाजारातील सतत होणारी उलाढाल. जागतिक आर्थिक बाजारातील परिस्थितीवर भारतीय बाजारपेठेतील सोन्याची किंमत ठरवण्यात महत्त्वाची भूमिका ठरते. आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 7,340 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम 8,007 आहे. आज भारतात चांदीची किंमत 1,02,100 प्रति किलोग्राम आहे.

आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्रॅम: 7,340 रु
8 ग्रॅम: रु 58,720 रु
10 ग्रॅम: 73,400 रु
100 ग्रॅम: 7,34,000 रु

आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्रॅम: 8,007 रु
8 ग्रॅम: 64,056 रु
10 ग्रॅम: रु 80,070 रु
100 ग्रॅम: रु 8,00,700 रु

महाराष्ट्रातील प्रमुख शहारातील सोन्याचे भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,340 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,007 रुपये प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,340 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,007 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,340 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,007 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,340 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,007 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,343 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,010 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,340 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 8,007 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,340 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8,007 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+