Gold Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे ताजे भाव
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात दररोजच वाढ होताना पाहायला मिळतेय . आज मंगळवारी 22 ऑक्टोबरला सोन्याच्या दराने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत. सोन्याचे भाव दररोज नव-नवीन उच्चांक गाठत आहेत.गुंतवणूकदरांची पहिली पसंदी नेहमीच सोनं खरेदी करायला राहिली आहे.
ऑक्टोबर महिन्यापासूनच सणांचा हंगाम सुरू झाला आहे. आता आठ दिवसावर धनत्रयोदशी, दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या चांदीच्या दरात अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 79 ते 80 हजार रुपयांच्या आसपास आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दर 73 हजार रुपयांच्या घरात आहे. दरम्यान आज चांदीच्या दरात मोठी उसळी नोंदवण्यात आली आहे. 1 किलो चांदीचा भाव आज 100 रुपयांनी वाढून 1,01,100 रुपयांवर पोहोचला आहे. तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहारातील सोन्याचे भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,300 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,964 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,300 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,964 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,300 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,964 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,300 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,964 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,303 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,967 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,300 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,964 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,300 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,964 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications