Gold Price Today : सोनं पुन्हा महागलं, चांदीची काय स्थिती आहे? जाणून तुमच्या शहरातील ताजे भाव
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किंमती दररोज चढ-उतार होत आहेत. सोने-चांदीतील हे बदल गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.
आज सोन्याच्या किंमतीत थोडीशी वाढ झाली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलू शकतात. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता सारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजार आणि स्थानिक करांवर अवलंबून असतात. याशिवाय जागतिक आर्थिक परिस्थिती डॉलरचा दर आणि कच्च्या तेलाच्या किमतींचाही सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो.

आज देशभरात 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,525 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,209 रुपये आहे. आज भारतात चांदी प्रति किलोग्रॅम 96,500 आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,525 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,209 रुपये आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,525 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,209 रुपये आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,525 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,209 रुपये आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,525 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,209 रुपये आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,528 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,212 रुपये आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,525 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,209 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,525 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,209 रुपये आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications