Gold Price Today: आज सोने महाग की स्वस्त? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
Gold Price Today : सोन्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणीला दोन दिवसांपासून ब्रेक लागला आहे. गुरुवारी 21 रोजी नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 20 नोव्हेंबरच्या तुलनेत आज सोने 800 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत होती. मात्र आता त्यावर ब्रेक लागला आहे.
येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या तरी सोने-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपये आहे.

चांदीच्या दरातही सुमारे 400 रुपयांनी वाढ झाली आहे. आज गुरुवार 21 रोजी नोव्हेंबर रोजी चांदी 92,000 रुपये प्रति किलो आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,145 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,795 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,145 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,795 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,145 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,795 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,145 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,795 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,148 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,798 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,145 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,795 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,145 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,795 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications