Gold Price Today: सलग चौथ्या दिवशी सोनं स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरात सोन्याचा दर
Gold Price Today: मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज शनिवार 21 डिसेंबर रोजी पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सलग चौथ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही लग्नाच्या सीझनमध्ये सोने खरेदी करायचे असेल तर ही एक उत्तम संधी आहे. बाजारातील तज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
आज 21 डिसेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 350 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 350 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 22 कॅरेट सोन्याचा दरही जवळपास 350 रुपयांनी स्वस्त झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 76 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 70 हजार रुपयांच्या पुढे आहे. आज 21 डिसेंबर रोजी चांदीच्या दरात किलोमागे दोन हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीचा दर 90,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,039 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,679 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,039 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,679 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,039 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,679 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,039 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,679 प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,042 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,682 रुपये प्रति ग्रॅम आहे.
कोल्हापूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,039 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,679 रुपये प्रति ग्रॅम आहे.
सोलापूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,039 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,679 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,039 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,679 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,039 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,679 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications