Gold Price Today: नववर्षाच्या दुस-या दिवशी सोनं स्वस्त की महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Price Today: मागील वर्षी सोन्या-चांदीच्या दरात अनेकवेळा मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला. यावेळेस नवीन वर्षाच्या दुस-या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज गुरुवार 2 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. 1 जानेवारीच्या तुलनेत आज सोने 500 रुपयांनी महागलं आहे. मात्र चांदीचे भाव स्थिर राहिले असून त्यात कोणताही बदल झालेला नाही.
देशभरात 2 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. गेल्या वर्षी सोन्याने 2024 मध्ये गुंतवणूक केलेल्यांना 27 टक्के परतावा दिला आहे. 2010 पासून सोन्याची ही कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. सध्या लग्नाचे सीझन आहे. त्यामुळे येत्याकाळात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान चांदीच्या दरात कोणताही चढ-उतार झालेला नाही. आज एक किलो चांदीचा दर 90,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,180 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,833 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,180 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,833 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,180 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,833 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,180 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,833 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,183 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,836 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,180 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,833 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,180 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,833 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications