Gold Price Today : सोन्याच्या दराने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले, जाणून घ्या आजचा भाव
Gold Price Today : मागील आठवाड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात दररोज वाढ होताना पाहायला मिळतेय . आज शनिवारी 19 ऑक्टोबरला सोन्याच्या दराने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत. सोन्याचे भाव दररोज नव-नवीन उच्चांक गाठत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकीवर आहेत. गुंतवणूकदरांची पहिली पसंदी नेहमीच सोनं राहिली आहे.
ऑक्टोबर महिन्यापासूनच सणांचा हंगाम सुरू झाला आहे. दसरा संपल्यानंतर आता करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात वाढ मोठी होण्याची शक्यता आहे.

देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 79 ते 80 हजार रुपयांच्या आसपास आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दर 72 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
दरम्यान आज चांदीच्या दरात मोठी उसळी नोंदवण्यात आली आहे. चांदी 96,100 रुपये प्रतिकिलो आहे. तर चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहारातील सोन्याचे भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,280 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,942 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,280 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,942 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,280 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,942 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,280 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,942 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,283 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,945 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,280 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,942 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,280 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,942 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications