Gold price : सोने स्वस्त झाले आहे की भाव वाढले आहेत? खरेदी करावे की थांबावे जाणून घ्या आजचे ताजे दर
Gold price today : सोन्याचे दर गगणाला भिडले असून लाखांपर्यंत सोने पोहचत आहे. अशातच आता सोने खरेदी करावे की, थांबावे अशा पेचात अनेक ग्राहक आहेत, तर दुसरीकडे लग्नसराईमुळे सोने खरेदी करने अनेक कुटुंबांना अपरिहार्य बनले आहे. अशा स्थितीत जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करणार असाल तर, तुम्हाला आज सोन्याचे भाव काय आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
सोन्याच्या किमतीत दररोज बदल होत आहेत, ज्याचा परिणाम सामान्य लोकांपासून ते ज्वेलर्स आणि गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांना होतो. गेल्या काही दिवसांत सोन्याचे भाव बेभरवशी झाले आहेत. आज १९ मे २०२५ रोजीही देशभरात सोन्याच्या किमतीत चढ-उतार दिसून आले. वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत थोडा बदल झाला. आजचा नवीनतम दर काय आहे आणि बाजारातील परिस्थिती काय आहे हे आपण पाहूया.

काय आहेत सोन्याचे भाव
आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹९,५५१ इतका आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹८,७५५ आणि १८ कॅरेट सोन्याचा दर ₹७,१६३ प्रति ग्रॅम आहे. आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम ₹९६.९० रुपये तर प्रति किलोग्रॅम ₹९६ हजार ९०० रुपये इतका आहे.
भारतात प्रति ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत
१ ग्रॅम: ८,७५५ रुपये
८ ग्रॅम: ७०,०४० रुपये
१० ग्रॅम: ८७,५५० रुपये
१०० ग्रॅम: ८,७५,५०० रुपये
भारतात २४ कॅरेट सोन्याचा आजचे प्रति ग्रॅम भाव
१ ग्रॅम: ९,५५१ रुपये
८ ग्रॅम: ७६,४०८ रुपये
१० ग्रॅम: ९५,५१० रुपये
१०० ग्रॅम: ९,५५,१०० रुपये
भारतात १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा आजचा भाव
१ ग्रॅम: ७,१६३ रुपये
८ ग्रॅम: ५७,३०४ रुपये
१० ग्रॅम: ७१,६३० रुपये
१०० ग्रॅम: ७,१६,३०० रुपये
देशातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव काय?
- (शहर) (२२ कॅरेट) (२४ कॅरेट) (१८ कॅरेट)
- नागपूर ₹८,७५५ ₹९,५५१ ₹७,१६३
- पुणे ₹८,७५५ ₹९,५५१ ₹७,१
- मुंबई ₹८,७५५ ₹९,५५१ ₹७,१६३ ३
- दिल्ली ₹८,७७० ₹९,५६६ ₹७,१७६
- चेन्नई ₹८,७५५ ₹९,५५१ ₹७,२१० २












Click it and Unblock the Notifications