Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नेहमीच सातत्याने वाढ पाहायला मिळते. मात्र मागील आठवड्यापासून सोन्याच्या दरात घसरण होत आहे. आज गुरुवार 19 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात झालेली घसरण म्हणजे ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांना एक मोठा दिलासा आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही आता सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.
आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. प्रति 10 ग्रॅममध्ये सोन्याच्या दरात 150 रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. 22 कॅरेट सोन्याचा दरात 130 रुपयांनी तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरला आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,000 रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत. आज 19 डिसेंबर रोजी चांदीचे भाव स्थिर राहिले. एक किलो चांदीचा दर 92,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,134 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,783 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,134 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,783 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,134 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,783 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,134 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,783 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,137 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,786 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,070 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,713 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,070 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,713 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications