युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर
Gold Price today 18 march 2026 : तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल, तर आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Fed) महत्त्वपूर्ण निर्णयापूर्वी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट नोंदवण्यात आली आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात 'लाल निशाण' पाहायला मिळाले असून, प्रति १० ग्राममागे ३३० रुपयांची कपात झाली आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate in India - 18 March 2026)
देशांतर्गत सराफा बाजारात आज विविध शुद्धतेच्या सोन्याचे दर जाणून घेऊया.
२४ कॅरेट (९९.९% शुद्धता)
- प्रति ग्राम: ₹१५,७७५ (₹३३ ची घट)
- प्रति १० ग्राम: ₹१,५७,७५० (₹३३० ची घट)
२२ कॅरेट (९१.६% शुद्धता - दागिन्यांचे सोने):
- प्रति ग्राम: ₹१४,४६० (₹३० ची घट)
- प्रति १० ग्राम: ₹१,४४,६०० (₹३०० ची घट)
१८ कॅरेट (७५% शुद्धता):
- प्रति ग्राम: ₹११,८३१ (₹२५ ची घट)
- प्रति १० ग्राम: १,१८,३१० (₹२५० ची घट)
MCX आणि चांदीचे दर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर देखील आज सकाळी सोन्याचे एप्रिल वायदा दर ०.२१% नी घसरून ₹१,५५,६६२ प्रति १० ग्रामवर व्यवहार करत होते. दुसरीकडे, चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीचा मे वायदा ०.७६% नी घसरून ₹२,५१,२०० प्रति किलो वर आला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
१. मुंबई (Mumbai)
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹१,५७,७५०
- २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹१,4४,६००
२. पुणे (Pune)
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹१,५७,७५०
- २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹१,४४,६००
३. नाशिक (Nashik)
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹१,५७,८००
- २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹१,४४,६५०
४. नागपूर (Nagpur)
- २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹१,५७,७८०
- २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹१,४४,६३०
(टिप - वरील दरांमध्ये ३% जीएसटी आणि घडणावळ शुल्क म्हणजेच मेकींग चार्जेस समाविष्ट नाही.
का घसरले सोन्याचे भाव?
अमेरिकन फेडरल ओपन मार्केट कमिटी आज व्याजादरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. अमेरिकेने व्याजादर स्थिर ठेवण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि महागाईची चिंता यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी सावधगिरीची भूमिका आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे.
(Disclaimer):
या वेबसाईटवर व्यक्त केलेली मते केवळ माहितीच्या उद्देशाने दिली आहेत. सोन्या-चांदीचे दर हे जागतिक घडामोडींनुसार सतत बदलत असतात. कोणतीही गुंतवणूक किंवा खरेदी करण्यापूर्वी कृपया आपल्या अधिकृत ज्वेलर्सशी किंवा आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.












Click it and Unblock the Notifications