Gold price Today : आज सोनं स्वस्त की महाग ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजेभाव
Gold price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने- चांदीच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. आज 18 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये कोणताही ब्रेक लागलेला नाही. दररोज सोने-चांदीच्या दरात वाढ होत आहे.
देशभरात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 81 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. जर दर असाच राहिला तर तो लवकरच 82 हजारांवर पोहोचेल, जो सोन्याचा सर्वोच्च दर असेल. तर 22 कॅरेट सोने 74 हजार रुपयांच्या पुढे आहे. आज चांदीच्या किमतीतही 1000 रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीच्या किमतीही वाढतच आहेत. आज एक किलो चांदीच्या किमतीत 1000 रुपयांची वाढ झाली आहे. देशात एक किलो चांदीची किंमत 96,600 रुपये आहे. सध्या लगीन सराई असल्यामुळे येत्या काळात सोने-चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं बाजारातील तज्ञाचं मत आहे. गेल्या वर्षी सोन्याने 2024 मध्ये गुंतवणूक केलेल्यांना 27 टक्के परतावा दिला आहे. 2010 पासून सोन्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,435 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,111 रुपये आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,435 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,111 रुपये आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,435 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,111 रुपये आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,435 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,111 रुपये आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,438 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,111 रुपये आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,435 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,111 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,435 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,111 रुपये आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications