Gold Price Today : सोन्याने 80 हजारांचा टप्पा ओलांडला, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Price Today : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोने- चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत 550 रुपयांची वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. तर 22 कॅरेट सोने 74 हजार रुपयांच्या पुढे आहे. आज चांदीच्या किमतीतही 2000 रुपयांची वाढ झाली आहे.
सध्या लगीन सराई असल्यामुळे येत्या काळात सोने-चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं बाजारातील तज्ञाचं मत आहे. गेल्या वर्षी सोन्याने 2024 मध्ये गुंतवणूक केलेल्यांना 27 टक्के परतावा दिला आहे. 2010 पासून सोन्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.

चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. आज एक किलो चांदीच्या किमतीत २००० रुपयांची वाढ झाली आहे. देशात एक किलो चांदीची किंमत 95,500 रुपये आहे. 2024 मध्ये एक किलो चांदीची किंमत 1,00,000 रुपयांच्या पुढे गेली होती. यावर्षीही चांदीच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,127 रुपये आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,127 रुपये आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,127 रुपये आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,127 रुपये आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,453 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,127 रुपये आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,127 रुपये आहे.
औरंगाबाद - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,450 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,127 रुपये आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल












Click it and Unblock the Notifications