मकर संक्रांतीनंतर सोन्याचा भाव किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा दर किती आहे?
Gold Price Today: नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढत आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीत सोने ही नेहमीच लोकांची पहिली पसंती राहिली आहे. आज 16 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे. सोने 80 हजार रुपयांच्या पुढे आहे. सोन्याचे दर दररोज ग्रीन अलर्टसह उघडत आहेत.
भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 80 हजार रुपये आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलयचं झालं तर त्याची किंमत 73 हजार रुपयांच्या पुढे आहे. चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. आज एक किलो चांदीचा दर 93,400 रुपये आहे.

सध्या लगीन सराई असल्यामुळे येत्या काळात सोने-चांदीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं बाजारातील तज्ञाचं मत आहे. गेल्या वर्षी सोन्याने 2024 मध्ये गुंतवणूक केलेल्यांना 27 टक्के परतावा दिला आहे. 2010 पासून सोन्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,390 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,062 रुपये आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,390 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,062 रुपये आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,390 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,062 रुपये आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,390 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,062 रुपये आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,393 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,062 रुपये आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,390 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,062 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,390 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,062 रुपये आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications