Gold Price Today : आज पुन्हा सोनं स्वस्त झालं, जाणून घ्या तुमच्या शहरातील 22, 24 कॅरेट सोन्याचा दर
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ पाहायला मिळाली. मात्र पुन्हा एकदा आज रविवार 15 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे भाव कमी होत आहेत.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत.

चांदीच्या दरातही आज 15 डिसेंबर रोजी घट झाली आहे. कालच्या तुलनेत आज चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. एक किलो चांदीचा दर 95,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,143 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,792 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications