सोने खरेदी करायचे आहे, खरेदी करा, आज शनिवारी सोने स्वस्त झालं, जाणून घ्या आजचा भाव
Gold Price Today : मागील दोन आठवड्यापासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होताना पाहायला मिळाली. मात्र आज शनिवार 14 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 550 रुपयांनी घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मागील आठवड्यात सोने 80 हजारांच्या घरात पोहोचले होते.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,000 रुपयांच्या जवळापास आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 72 हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजारातील तज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ होऊ शकते.

आज शनिवारी चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदी आज शनिवारी प्रतिकिलो तीन हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. 14 डिसेंबर रोजी एक किलो चांदीचा दर 93,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,143 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,792 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications