Gold Price Today : सोने पुन्हा झालं स्वस्त,जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने-चांदीचे ताजे भाव
Gold Price Today : मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज बुधवार 13 नोव्हेंबरला सोनं दरात चांगलीच घसरण झाली आहे. सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात होणारी घसरण लग्नसराईत सोने-चांदी खरेदी करणा-यासाठी एक चांगली संधी आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 76 हजार रुपयांच्या पुढे आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत सुमारे 70 हजार रुपयांच्या पुढे आहे. चांदीच्या दरातही घसरण होत आहे.

गेल्या आठवडाभरात चांदीच्या भावात तीन हजार रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. चांदीचा भाव सध्या 91000 रुपये प्रति किलो आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहेत?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,045 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,685 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,045 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,685 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,045 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,685 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,045 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,685 प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,048 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,688 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,045 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,685 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,045 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,685 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications