Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price today: सोन्याचा आजवर ऐतिहासिक विक्रम! सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले सोने, आज मोठी दरवाढ

Gold Price today 12 september 2025 : सोन्याच्या दराने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, सोने आज पुर्ण काळात सर्वात जास्त वधारले आहे. ही गोष्ट सामान्यांना आणखीनच चिंतेत भर पाडणारी आहे, कारण सोन्याचे दर आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. आज १२ सप्टेंबर २०२५ रोजी भावात मोठी तेजी आली असून या तेजीमुळे सराफा बाजारातही खळबळ आहे.

सोन्या-चांदीचे भाव आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घटकांमुळे दररोज बदलत असतात. आज १२ सप्टेंबर रोजी, सोन्याच्या दरात किरकोळ घसरण दिसत असली तरी, देशात सोन्याचा भाव पुन्हा एकदा 'ऑल-टाइम-हाय' (All-Time-High) म्हणजेच विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे.

Gold Price today 12 september 2025

आज १२ सप्टेंबर २०२५ रोजी सोन्याचे भाव काय?

आज, २४ कॅरेट सोन्याचा राष्ट्रीय दर प्रति १० ग्रॅम ₹ १,१०,४९९ वर पोहोचला आहे, तर २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम ₹ १०,१२९ आणि १८ कॅरेट सोने प्रति ग्रॅम ₹ ८,२८७ दराने विकले जात आहे.

वायदे बाजारात स्थिती काय आहे?

आज सकाळी वायदा बाजारात (MCX) सोन्या-चांदीच्या दरांमध्ये जोरदार वाढ झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कमी करण्याच्या शक्यतेमुळे, गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे, ज्यामुळे दर वाढले.

सकाळी सोन्याचे दर काय होते?

आज सकाळी ९:३३ वाजता, सोन्याचा दर ०.५८% च्या वाढीसह ₹ १,०९,६१० प्रति १० ग्रॅम होता. तर चांदीचा दर चांदीचा दर १.२७% ने वाढून ₹ १,२८,५५० प्रति किलोवर पोहोचला. इंडियन बुलियन असोसिएशन (IBA) नुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹ १,१०,०२० प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹ १,००,८५२ प्रति १० ग्रॅम आहे.

१० प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर (₹/१० ग्रॅम)

दिल्ली: २४ कॅरेट: ₹ १,१०,५५० | २२ कॅरेट: ₹ १,०१,२००

मुंबई: २४ कॅरेट: ₹ १,१०,४८० | २२ कॅरेट: ₹ १,०१,१८०

कोलकाता: २४ कॅरेट: ₹ १,१०,५०० | २२ कॅरेट: ₹ १,०१,१९०

चेन्नई: २४ कॅरेट: ₹ १,१०,७०० | २२ कॅरेट: ₹ १,०१,४००

बंगळूरु: २४ कॅरेट: ₹ १,१०,४५० | २२ कॅरेट: ₹ १,०१,१५०

हैदराबाद: २४ कॅरेट: ₹ १,१०,४५० | २२ कॅरेट: ₹ १,०१,१५०

अहमदाबाद: २४ कॅरेट: ₹ १,१०,५२० | २२ कॅरेट: ₹ १,०१,२२०

लखनऊ: २४ कॅरेट: ₹ १,१०,५३० | २२ कॅरेट: ₹ १,०१,२१०

पटना: २४ कॅरेट: ₹ १,१०,४९० | २२ कॅरेट: ₹ १,०१,१८०

चंदीगढ: २४ कॅरेट: ₹ १,१०,५४० | २२ कॅरेट: ₹ १,०१,२३०

सोन्याचे भाव का वाढत आहेत?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा कल अधिक सुरक्षित गुंतवणूक समजल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीकडे वाढला आहे, ज्यामुळे त्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+