Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : महानवमीच्या दिवशी सोने स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घ्या

gold Price today : सोने ही नेहमीच गुंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे. हा महिना सण-उत्सावाचा असल्याने सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पहायला मिळते. आज देशभरात नवरात्रीची महानवमी साजरी होत आहे. नवरात्रीच्या या खास मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्यासाठी एक मोठी संधी आहे. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात किंचित घट नोंदवण्यात आली आहे. सध्या भारतात सोन्या-चांदीचा भाव नव-नवीन उच्चांक गाठत आहे.

देशभरात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 70,000 रुपयांच्या पुढे गेली आहे तर 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. प्रत्येक शहरानुसार सोन्याच्या किंमतीत थोडाफार फरक आहे.

gold price today

गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज भावात घसरण झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत चांदी सध्या 93,900 रुपये प्रतिकिलो आहे. जाणून घेऊया प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

राज्यातील प्रमुख शहरातील आज सोन्याचे दर

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,740 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,740 प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,740 प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,740 प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,098 रुपये रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,743 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,740 प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,095 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,740 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+