Gold Price Today : सोनं महागलं, लग्नाच्या सीझनमध्ये सोने खरेदी करायचे असेल तर जाणून घ्या आजचे भाव
Gold Price Today : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या किंमती सातत्याने वाढ होत आहेत. आज नवीन वर्षाचा 11 वा दिवस आहे, तरीही सोन्याच्या किंमतीत एकाही दिवशी घट झालेली नाही. सोने दिवसेंदिवस महाग होत आहे. आज शनिवार 11 जानेवारी 2025 रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे.
आज देशभरात 24 कॅरेट सोने 80 हजारांच्या जवळपास पोहोचले आहे. सोन्याचे दर दररोज ग्रीन अलर्टसह उघडत आहेत. शनिवारी, 11 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत काहीशी वाढ झाली आहे.

भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79 हजार रुपये आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या किंमत 72 हजार रुपयांच्या पुढे आहे. सध्या लग्नाचा सीझन आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सोन्याचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
आज चांदीच्या किंमतीत एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 93,500 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,286 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,948 आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,286 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,948 आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,286 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,948 आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,286 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,948 आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,286 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,951 आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,286 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,948 आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,286 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,948 आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications