Gold Price Today: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं,जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळते. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. आज सोन्याच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सणासुदीचा काळ असो किंवा मग लग्नाचा हंगाम असो किंवा गुंतवणूकदारांची चर्चा असो, भारतातील सोन्याची बाजारपेठ नेहमीच चर्चेत असते.
नवीन वर्ष 2025 च्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किंमतीत बदल होताना दिसत आहेत, याकडे सर्वसामान्यांचे तसेच मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जागतिक बाजार डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती आणि व्याजदर अशा अनेक घटकांवर सोन्याच्या किमती अवलंबून असतात. याव्यतिरिक्त भारतात सण आणि लग्नाच्या हंगामात सोन्याची मागणी वाढते, ज्याचा थेट त्याच्या किमतींवर परिणाम होतो.

देशभरात आज 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम 7,800 रुपये आहे. आज देशभरात चांदीची किंमत 90,500 प्रति किलोग्राम आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,153 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,803 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,150 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications