Gold Price Today : लग्नाच्या सीझनमध्ये सोन्या-चांदीचा भाव किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोमवार 2 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. सोने हे नेहमीच गंतवणूकदारांची पहिली पसंती राहिली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत असून, ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघेही सोने-चांदीच्या दराकडे लक्ष ठेवून आहेत. लग्नसराईच्या सीझनमध्ये सोन्याची मागणी वाढत असल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्याकडे परंपरेने सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिले जाते.

आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयाच्या पुढे आहे. आज भारतात चांदीची किंमत 91,400 रुपये प्रति किलोग्राम आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,735 प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,093 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,738 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,090 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,735 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications