पुढच्या 2 महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते! कुणी केले भाकित? किती होऊ शकतात भाव? वाचा
Gold price may fall in next 2 months prediction of Quant Mutual Fund : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती लाखांच्या आकड्याजवळ पोहचत आहेत. त्यामुळे सोन्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहचल्या आहेत, त्यामुळे सोन्याचे भाव पाहूनच लोक खरेदी करत आहे, तर अनेकजण भाव कमी होतील या आशेवर आहेत. अशांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सोन्याचे भाव येत्या दोन महिन्यात मोठी घसरण होणार असल्याचे भाकित क्वांट म्युच्यूअर फंडने केले आहे.
म्हणूनच.. जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहायला हरकत नाही, कारण तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन महिन्यांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकतात. हे भाकित क्वांट म्युच्युअल फंडचा आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, नवभारत टाईम्सने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार, या क्वांट म्युच्यूअल फंडाच्या मते, पुढील दोन महिन्यांत सोन्याची किंमत डॉलरच्या तुलनेत 12 ते 15 टक्क्यांनी कमी होऊ शकतात असे म्हटले आहे. जर आपण सोन्याचे आजचे भाव गृहीत धरल्यास 82 हजार ते 65 हजारांपर्यंत सोने खाली येऊ शकते.
..जून महिना या वस्तूंसाठी चांगला
क्वांट म्युच्युअल फंडचा असा विश्वास आहे की सोने दीर्घकाळाची महत्वाची गुंतवणूक असल्याने ती दिर्घकाळ चांगली कामगिरी करू शकते. म्हणूनच, त्यांनी गुंतवणूकदारांना सोन्यात त्यांची कमाई गुंतवण्याचा सल्ला दिला आहे. क्वांट म्युच्युअल फंडच्या मते, जून महिना हा सहसा कच्च्या तेलासाठी चांगला असतो. कच्च्या तेलाच्या किमती आता आणखी घसरणार नाहीत. जर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये जोखीम वाढली तर कच्च्या तेलाच्या किमती 10-12 टक्क्यांनी वाढू शकतात.
सोन्याच्या दरवाढीला इतर कारणे
- रशिया आणि युक्रेन युद्धापासून मध्य पूर्व तणावापर्यंत भौगोलिक-राजकीय तणाव. या कारणांमुळे सोने सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय बनला आहे.
- केंद्रीय बँकाही सोने खरेदी करत असल्याने भाववाढीचा फटका, ईटीएफचा प्रवाह कायम आहे.
- शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत.
अमेरिकेची धोरणेही सोन्याच्या दरवाढीला कारण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले शुल्क हे यासाठी सर्वात मोठे कारण आहे. गेल्या वर्षी, फेडने दर 100 बेसिस पॉइंटने कमी केले. परंतु सध्या, वाढ आणि चलनवाढीच्या चिंतेमुळे दरांमधील बदलांवर पुन्हा एकदा ब्रेक येऊ शकतो.
2025 वर्षात सोन्याचे भाव सर्वाधिक, 27 टक्के परतावा
2025 मध्ये सोन्याचा परतावा डॉलरच्या दृष्टीने पाहिल्यास, 2025 हे वर्ष आतापर्यंत सोन्यासाठी सर्वोत्तम ठरले आहे. 1980 पासून आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, या वर्षात सोन्याची सर्वाधिक दरवाढ ठरली आहे, ज्यामध्ये सुमारे 33 टक्के वाढ दिसून आली आहे. 2007 मध्ये सोन्याच्या किमतीत 31 टक्क्यांनी वाढ झाली. 2010 मध्येही, सोन्याच्या किमतीने 29 टक्के आणि 2024 मध्ये 27 टक्के मजबूत परतावा दिला आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications