Gold price : गेल्या 25 वर्षात सोन्याचे दर कुठून कुठे पोहोचले; जाणून घ्या पुढे किती असू शकतात भाव?

Gold price journey in India : सोने हे मनमोहक आणि आकर्षक धातू त्याचे दागिने तर अबाल-वृद्ध ते खासकरुन महिलांना खूपच भावतात. महिलांचा तर सोन्यात फारच जीव असतो. सोने दिसतात छान आणि ते परिधान करणाऱ्यांची सुंदरताही फुलवतात. एक काळ भारतात असाही होता की, सोन्याच्या किमती अगदी नगण्य होत्या.

एक अहवाल सांगतो की, 1964 या वर्षात सोन्याचा भाव 63 रुपये प्रतितोळा एवढा होता. नंतर हेच सोने विसाव्या शतकात 4 हजार रुपये प्रतितोळा एवढ्या दराने विकले जाऊ लागले. अलिकडे सोन्याचे भाव ऐकले तर डोळे विस्फारतात, कारण सोन्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

Gold price journey in India

तर चला या लेखात आपण सोन्याचे भाव 25 वर्षांपुर्वी किती होते ते कसे बदलत गेले त्याची कारणे काय आणि सध्या किती भाव आहे, आगामी काळात सोन्याच्या दराची काय स्थिती राहू शकते हे जाणून घेऊया.

25 वर्षात सोन्याच्या किमतीत किती वाढ झाली?

गेल्या 25 वर्षात सोन्याच्या किमतीत 19 पटीने वाढ झाली आहे, ज्यामुळे भारतीय आणि अमेरिकन शेअर बाजारापेक्षा चांगला परतावा मिळतो. म्हणजेच शेअर बाजारापेक्षा चांगला परतावा सोने देत आहे असे तज्ज्ञ सांगतात.

सण 2000 मध्ये सोन्याचे 24 कॅरेटचे दर किती होते?

सध्या 2025 हे वर्ष सुरु आहे आणि 25 वर्षांपुर्वी म्हणजेच 2000 मध्ये सोन्याचे 24 कॅरेटचे दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 4,400 रुपये एवढे होते. तर 2020 मध्ये हेच दर 50,000 रुपयांपेक्षा जास्त झाले.

का वाढत गेले सोन्याचे भाव? हे आहेत मुद्दे

  • अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंद वाढ आणि तिजोरीतील घट यामुळे सोन्याच्या किमती वाढण्यास मदत झाली आहे. जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत असते तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात आणि सोने हे गुंतवणुकीचे सुरक्षित साधन मानले जाते.
  • रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेला संघर्ष म्हणजेच भू-राजकीय तणावामुळेही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे.
  • मध्यवर्ती बँका, विशेषत: भारत आणि पोलंड सारख्या उदयोन्मुख बाजारपेठेतील, त्यांच्या सोन्याच्या साठ्यात सातत्याने वाढ करत आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव वाढत गेले आणि हे सूचित करते की भविष्यातील आर्थिक अनिश्चितता टाळण्यासाठी ते सोन्याला सुरक्षित मालमत्ता मानतात.
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच विविध देशांवर शुल्क लादण्याची योजना आखली आहे. यामुळे व्यापारातील तणाव वाढू शकतो, ज्यामुळे सोन्याची मागणी आणखी वाढू शकते.
  • चीनमध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी कमी झाली तर तिथले लोक आता सोन्याच्या बार आणि नाण्यांमध्ये जास्त गुंतवणूक करत आहेत. या बदलाचा जागतिक मागणीवरही परिणाम होत आहे.

1. 25 वर्षांतील सोन्याचे भाव कसे बदलले?

वर्ष : सोन्याचे बदलते दर

  • 2025 (1एप्रिल) : 90,970
  • 2024 : 78,245
  • 2023 : 63,203
  • 2022 : 55,017
  • 2021 : 48,099
  • 2020 : 50,151
  • 2019 : 39,108
  • 2018 : 31,391
  • 2017 : 29,156
  • 2016 : 27,445
  • 2015 : 24,931
  • 2014 : 26,703
  • 2013 : 28,422
  • 2012 : 30,859
  • 2011 : 27,329
  • 2010 : 20,728
  • 2009 : 16,686
  • 2008 : 13,630
  • 2007 : 10,598
  • 2006 : 9,265
  • 2005 : 7,638
  • 2004 : 6,307
  • 2003 : 5,600
  • 2002 : 4,990
  • 2001 : 4,300
  • 2000 : 4,400

2. एक वर्षात किती रुपयांनी सोन्याचे दर वाढले

सण 2024 मध्ये सुरवातीला 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 63,352 रुपये होता. तर याच वर्षात एप्रिलमध्ये
24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा सरासरी 69,800 ते 70,000 इतका होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोन्याच्या दरात सुमारे 18 ते 20% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

तीन आणि चार एप्रिल 2025 रोजी सोन्याचे भाव काय?

तीन एप्रिल 2025 रोजी सध्या देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव सुमारे 92 हजार रुपये आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांबद्दल बोललो तर 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 82 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तर 4 एप्रिल रोजी सोन्याचे 24 कॅरेटचे भाव 93 हजार रुपयांच्या पुढे आहे तर 22 कॅरेटचे प्रतितोळा भाव 82 हजार रुपयांच्या पुढे आहे.

तीन आणि चार एप्रिल 2025 चे चांदीचे भाव काय?

चांदीचे दरही सोन्यासारखेच सातत्याने वाढत आले आहेत, पण चांदीच्या दरातही आज घट झाली आहे. 3 एप्रिल रोजी देशात एक किलो चांदीची किंमत 1,04,900 रुपये प्रति किलोग्राम एवढी आहे. तर 4 एप्रिल रोजी प्रति किलो 1,04,900 रुपये तेवढेच दर आहेत.

3. सोन्याच्या किमती 38 टक्क्यांनी घसरणार - बाजार विश्लेषकांचा अंदाज

बाजार विश्लेषक, तज्ज्ञ सूचित करतात की, सोन्याच्या दरात लक्षणीय मंदी येऊ असू शकते आणि ही गोष्ट संभाव्यतः खरेदीदारांना दिलासा देणारी ठरू शकते. जवळपास सोन्याच्या किमतीत 38 टक्क्यांपर्यंत घसरण होण्याचा अंदाज हे विश्लेषक वर्तवतात, यामुळे जगभरातील गुंतवणुकीच्या धोरणांना नवा आकार मिळू शकतो.

जॉन मिल्स, यूएस-आधारित वित्तीय सेवा फर्म मॉर्निंगस्टारचे मार्केट स्ट्रॅटेजिस्ट, सोन्याचा भाव प्रति औंस $1,820 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे, जे त्याच्या सध्याच्या अंदाजे $3,080 प्रति औंसच्या किमतीच्या अगदी उलट आहे. म्हणजेच जवळपास 38 टक्के सोन्याच्या दरात कपातीची शक्यता सांगितली जाते. म्हणजेच ही जर परिस्थिती आली तर सोन्याच्या बाजारपेठेत मोठा उलटफेर होऊ शकतो.

डिस्क्लेमर : सोन्याचे आगामी काळात भाव हे बाजारपेठेनुसार कमी जास्त होतील. वनइंडिया मराठी भाव किती कमी होतील आणि किती वाढतील याची हमी देत नाही. त्यामुळे गुंतवणुकीपुर्वी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+